अंजनेरी पर्वतरांगेत प्रतिकेदारनाथ म्हणून प्रचलित होत असलेल्या या मंदिराकडे भाविक आकर्षित होत आहेत.
२०१४मध्ये लोकार्पण झालेल्या या मंदिराविषयी सोशल माध्यमावर फोटो, व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर तब्बल सात वर्षांनी या मंदिराची माहिती भाविकांना मिळत आहे.
गेल्या महिनाभरापासून मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी वाढली आहे.